सत्र २०२५–२०२६ M.S.W. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व पात्रतेकरिता (CET) परीक्षेचा नियोजनासंबंधी
-
M.S.W. समाजकार्य परंपरागत अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी महाविद्यालयांमार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेशपूर्व सामाईक परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
-
समाजकार्य महाविद्यालयांतील M.S.W. या अभ्यासक्रमासाठी प्रवेशाकरिता विद्यापीठात नोंदणी (Registration) अर्ज ऑनलाईन करावयाचे असून दिनांक २३ जून २०२५ ते १२ जुलै २०२५ पर्यंत शुल्कासह अर्ज ऑनलाईन / ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
-
विद्यापीठात प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून सेव्ह / अपूर्ण झालेले विद्यार्थ्यांची यादी दिनांक १५ जुलै २०२५ रोजी प्रकाशित करण्यात यावी व दिनांक १७ जुलै २०२५ रोजी महाविद्यालये रोल नंबरसह अंतिम यादी प्रकाशित करावयाची आहे.
-
M.S.W. समाजकार्य परंपरागत अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी महाविद्यालयांमार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेशपूर्व सामाईक पात्रता (CET) ऑनलाईन MCQ पद्धतीची दिनांक २५ जुलै २०२५ रोजी शुक्रवार रोजी सकाळी १०.०० वाजता घेण्यात येईल.
-
M.S.W. या अभ्यासक्रमासाठी प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या CET परीक्षेचा निकाल महाविद्यालये यादी दिनांक २६ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करावयाची आहे.
-
दिनांक २८ जुलै २०२५ रोजी आराखड्यानुसार गुणवत्तावार यादी प्रकाशित करावयाची आहे.
-
समाजकार्य महाविद्यालयांनी M.S.W. अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्यांची यादी प्रकाशित करताना ८० टक्के B.S.W. व २० टक्के इतर अभ्यासक्रमातील प्राप्तांक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत.
-
समाजकार्य महाविद्यालयांनी गुणवत्तावार यादीनुसार दिनांक २९ जुलै ते ०२ ऑगस्ट २०२५ पर्यंत सायं. ५.०० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे.
-
समाजकार्य महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा प्रवेशासंबंधातील संपूर्ण कार्यवाहीचा अहवाल विद्यापीठाकडे दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ ला सायं. ५.०० वाजेपर्यंत सादर करणे अनिवार्य राहील.
-
दिनांक ०५ ते ०७ ऑगस्ट २०२५ दरम्यान उर्वरित असल्यास रिक्त जागांचे आराखड्यानुसार यादी प्रकाशित करून प्रवेश निश्चित करावयाचा आहे.